नागपूर शहर: नीट पेपरफुटी प्रकरण: नागपूरात सीबीआयचे छापे
देशभरात गाजत असलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे.सीबीआयच्या नवी दिल्ली येथील आर्थिक गुन्हे शाखेने नागपुरातील दोन विद्यार्थिनी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका विद्यार्थ्याच्या घरी झाडाझडती घेतली.या कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक, काही कागदपत्रे आणि नोट्स ताब्यात घेण्यात आल्या.