नागपूर शहर: 'ऑपरेशन थंडर'चा धमाका; किराणा दुकानाच्या आड चालणाऱ्या ई-सिगरेट रॅकेटचा पर्दाफाश : रश्मिता राव पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी 9 एप्रिलला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत मोठी कारवाई करत, किराणा दुकानाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रतिबंधित ई-सिगरेट विक्रीच्या रॅकेटचा छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांनी दिली आहे.