नागपूर शहर: राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठा भ्रष्टाचार; आरएसएस आणि भाजपच्या भूमिकेवर सुप्रिया श्रीनेत यांचा गंभीर आरोप
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी अयोध्येतील राम मंदिरात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचारावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार निशाणा साधला आहे. दिल्लीहून नागपूरला येत असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंदिरातील दान आणि सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.