तळा: पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवर संकट
Tala, Raigad | Jun 17, 2026 खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीची मशागत, बी-बियाण्यांची उपलब्धता तसेच खतांची जमवाजमव यांसह पेरणीपूर्व सर्व तयारी पूर्ण केली आहे. मात्र जून महिना अर्धा संपत आला तरी अद्याप पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून त्याच्या नजरा आभाळाकडे खिळल्या आहेत. अनिश्चितते मुळे पेरणी खोळंबली असून तळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागली आहे. हा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.