नागपूर शहर: “आवाज महाराष्ट्राचा” – नागपूरच्या परिवर्तनाचा नवा संकल्प; युवक काँग्रेसची पत्र परिषद संपन्न
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जनतेमध्ये जाण्याच्या राजकीय परंपरेला छेद देत, युवक काँग्रेसने नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरातून “आवाज महाराष्ट्राचा” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा जाहीर शुभारंभ करण्यात आला.