घनसावंगी: चित्रवडगाव शिवारातील पाणंद रस्त्याची दुरवस्था; शेतकरी, विद्यार्थी व नागरिक त्रस्त
घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव शिवारातील रेल्वे गेट ते येवला शिवाराकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि काटेरी झुडपे वाढल्याने शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी चित्रवडगाव येथील शेतकरी तुकाराम दत्तात्रय सोसे यांनी जिल्हाधिकाऱ्या