नागपूर शहर: प्लॉट देण्याच्या नावाखाली फसवणूक;२० हून अधिक जणांची फसवणूक : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 30 जुलैला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार प्लॉट खरेदी करूनही सेल डीड न मिळाल्याने आणि तेच प्लॉट इतरांना विकल्याप्रकरणी सुभाष प्रभाकर उके यांच्यासह २० पेक्षा जास्त नागरिकांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या पोलीस तपासात धनराज शालिग्राम गौतम, अजय चंद्रकुमार सूर्यवंशी आणि रमेश हेमराज हरिनखेडे या आरोपींची नावे समोर आली आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.