वणी: कायर चौपाटी येथून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता, शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Jun 13, 2025 शाळेच्या सुट्टीत काकाकडे आलेला पुतण्या भर चौपाटीवरून बेपत्ता झाला. कायर येथे बुधवारी ही घटना घडली. कटींग करून घरी येतो असे सांगून पुतण्या कायर चौपाटीवर थांबला होता. मात्र रात्री झाली तरी तो घरी परतलाच नाही. अखेर पुतण्याला कुणीतही पळवल्याच्या संशयावरून काकाने तक्रार दिली. शिरपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.