मानगाव: कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना सरकारचा दिलासा
Mangaon, Raigad | Jun 27, 2026 कोकण विभागातील अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत मदतीचा ४२६ कोटींचा निधी पुढील १५ दिवसांत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.