अलिबाग: अलिबाग जेट्टीवर दहशतवादविरोधी मॉक ड्रिल
Alibag, Raigad | May 16, 2026 अलिबाग जेट्टी परिसरात संशयास्पद बोटीतून दहशतवादी विस्फोटके घेऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ धाव घेत व्यापक मॉक ड्रिल राबविली. भविष्यात अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देता यावा आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेण्यात आले.