नागपूर शहर: कळमना रोड परिसरात महावितरणचा जीवघेणा निष्काळजीपणा; उघड्या फीडर पिलरमुळे शाळकरी मुलांच्या जिवाला धोका
6 एप्रिल ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कळमना रोड, वांझरा आणि पार्वती नगर परिसरात वीज विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथील रस्त्यांवरील विद्युत फीडर पिलर आणि जंक्शन बॉक्सची दारे उघडी असून, त्यातून बाहेर आलेले जिवंत तारांचे जाळे कोणत्याही मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देत आहे. या गंभीर प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.