तुमसर: शहरातील बावनकर चौक येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल; ७.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त
तुमसर पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तुमसर शहरातील बावनकर चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तुमसर येथील बावनकर चौकात २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी एका ट्रॅक्टरला थांबवले. चौकशीत असे समोर आले की, ट्रॅक्टर चालक उमाशंकर देवदास मुकुरणे (वय ४६, रा. डोंगरला, ता. तुमसर) याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता.