नाशिक: इंदिरानगर पोलिसांनी संतोष काळेच्या पत्नीसोबत एकाला अहिल्यानगर येथून केली अटक
Nashik, Nashik | Sep 14, 2025 बिगारी इसमाच्या खुनाचा उलगडा झाला असून इंदिरानगर पोलिसांनी मास्टरमाईंड त्याची पत्नी असल्याचे तपासात समोर आले आहे.संतोष काळेची बायको हिचे अहिल्यानगर येथील एका इसमा समवेत अनैतिक संबंध आहेत.संतोष काळे हा तिला नेहमी दारू पिऊन मारहाण करायचा. अनेक वर्षे तिने हा त्रास सहन केला.संतोष काळेचा मृतदेह गरवारे बस स्टॉपच्या मागे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. पोलिसांनी त्याच्या पत्नीसह एकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.