नागपूर शहर: नागपूर-वर्धा महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग; मिरचीची पोती रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीचा खोळंबा
नागपूर-वर्धा महामार्गावरील चिंचभुवन परिसरात आज मिरची घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा ट्रक मिरची घेऊन जात असताना चिंचभुवन परिसरात अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच ट्रकला आगीने विळखा घातला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.