कोंडोबा तात्या ढवळे विद्यालय येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
1.1k views | Malegaon, Washim | Sep 28, 2025 वाशिम (दि.२६,सप्टेंबर): मालेगाव तालुक्यातील शिरपूर उपकेंद्र अंतर्गत कोंडोबा तात्या ढवळे विद्यालय येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या वेळी दहावीच्या 206 विद्यार्थ्यांना TD लस देण्यात आली. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, Good Touch–Bad Touch तसेच मासिक पाळीविषयक आरोग्य शिक्षण देऊन त्यांच्या शंका निरसन करण्यात आले.