धामणी येथे क्षयरोग तपासणी शिबिर; 118 एक्स-रे, 60 थुंकी नमुने गोळा*
Washim, Washim | Oct 23, 2026 वाशिम, दि. 22 -* जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी अंतर्गत आरोग्य उपकेंद्र वाई येथे क्षयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर नांदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन वैद्य, डॉ. प्रशांत महाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी शिबिराचे नियोजन केले. यावेळी हॅन्ड हेल्ड मशीनद्वारे एक्स-रे तपासणी करण्यात आली. टेक्निशियन कार्तिक शिरसाट यांनी 93 तर क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी सतीश सैबेवार यांनी 25 असे एकूण 118 एक्स-रे काढले. तसेच 60 थुंकी (स्पुटम) नमुने गोळा करण्यात आले. यावेळी रामकृष्ण राठोड, दिपक काळे, निलेश पाटील, अक्षय सानप, वंदना देवळे, मनिष जाधव, आकाश केंद्रे, सर्व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. उपस्थितांना जोश ऍक्टिव्हिटी अंतर्गत शपथ देऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात आली.