नागपूर शहर: टिट्या गॅंगवर पुन्हा एकदा 'मकोका' अंतर्गत कारवाई: सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 29 जून ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल नगर परिसरातील रिंकू उपाध्याय यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या कुख्यात टिट्या गॅंगवर पोलिसांनी 'मकोका' कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या गॅंगवर मकोकाची ही दुसरी कारवाई आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.