परळी: निवडणूक संदर्भात परळी तहसीलमध्ये आढावा बैठक
Parli, Beed | Sep 23, 2024 परळी विधानसभा मतदारसंघ 233 च्या निवडणूक संदर्भात नियोजन आढावा बैठक सोमवार दि.23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय परळी येथे पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,गविअ नागरगोजे , नायब तहसीलदार बाबुराव रुपनर आणि अण्णासाहेब वंजारे, तलाठी गित्ते व सर्व कार्यालय प्रमुख यांचे उपस्थितीत ही बैठक सपन्न झाली.