परळीत धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक :२३ सप्टेंबर रोजी रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-शिवदास बिडगर
Parli, Beed | Sep 22, 2024 _परळीत धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक :२३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-शिवदास बिडगर_ *धनगर आरक्षण चलो परळी-वैद्यनाथ चलो परळी-वैद्यनाथ* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पंढरपूर , लातूर , नेवासा या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर समाजच्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून धनगर आरक्षण अंमलबजावणी एसटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोमवार दिनांक 23/9/24 रोजी सकाळी 10 वाजता परळी-वैद्यनाथ येथील ईटके काॅर्नर येथे रस्ता रोको चे आयोजन करण्यात आले आहे.