धनगर आरक्षणासाठी परळीतील ईटके काॅर्नर येथे तासभर रास्ता रोको आंदोलन ; वाहनांच्या लागल्या रांगा
Parli, Beed | Sep 23, 2024 धनगर आरक्षणासाठी परळीतील ईटके काॅर्नर येथे तासभर रास्ता रोको आंदोलन ; वाहनांच्या लागल्या रांगा सरकारने तत्परता न दाखवल्यास उग्र आंदोलनाचा दिला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पंढरपूर , लातूर , नेवासा या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर जमातीच्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून धनगर आरक्षण अंमलबजावणी एसटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी आरक्षणाच्या हक्कासाठी धनगर जमातीच्या वतीने परळी-वैद्यनाथ येथील ईटके काॅर्नर येथे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. सरकारचा जाहीर निषेध नोंदवत घोषणा दिल्या. परळी-वैद्यनाथ येथील ईटके काॅर्नर आंदोलकांनी बीड -परभणी-नांदेड महामार्ग रोखून धरला. या रास्ता रोकोमुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे काही काळ वाहतुक खोळंबली होत.