नवगण महाविद्यालय परळी येथे "पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन" विषयावर जनजागृती कार्यक्रम संपन्न
Parli, Beed | Sep 21, 2024 नवगण महाविद्यालयाच्या वतीने "नैसर्गिक पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन" या महत्त्वपूर्ण विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रह्मकुमारी केंद्राचे महेश भाई, बालासाहेब भाई, आणि शेरे भाई हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर आघाव हे होते.