पक्षाचे एबी फॉर्म घेऊन पैशासाठी उमेदवारी अर्ज पाठी घेणाऱ्या उमेदवारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी ठाकरे गट आणि मनसेने केली आहे. यासंदर्भात श्रीनगर पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5च्या सुमारास तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी माजी खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे आणि मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते. पैशांचा खेळ करून नगरसेवक बिनविरोध निवडून आले असल्याचा आरोप ठाकरे गट आणि मनसेने केला आहे.