हवेली: खाजगी आस्थापनांचे ड्रेनेज पाणी वाघोली-लोहगाव रस्त्यावर स्थानिक नागरीक त्रस्त
Haveli, Pune | Oct 10, 2025 खाजगी आस्थापनांचे ड्रेनेज पाणी वाघोली-लोहगाव रस्त्यावर वाहत आहे. यावर सदर आस्थापनाद्वारे कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. या ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरातील नागरिक व प्रवास करणाऱ्या नागरीकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे. या संदर्भात त्रस्त नागरीकांनी व सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव यांनी जाब विचारला.