लातूर -आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या — मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लातूर शहर जिल्हा भाजपाकडून उमेदवारी अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांकडून मोठी भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांत ७० जागांसाठी ६५० पेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी आज सायंकाळी 5 वाजता दिली.