जालना: जालन्यात सहा जनावरांसह बोलेरो पिकअप पकडली; तीन गोमाता व तीन वासरे आढळली; क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहून नेल्याचा आरोप
Jalna, Jalna | Sep 26, 2026 गणपती दर्शन घेऊन मध्यरात्री घरी परतणार्या काही तरुणांना विशाल कॉर्नर परिसरात संशयास्पद बोलेरो पिकअप दिसली. संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग करून साईसिटी परिसरात ते थांबविले. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये तीन गोमाता आणि तीन वासरे आढळून आली. त्यानंतर डायल 112 वर माहिती देण्यात आली. शनिवार दि. 26 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनचालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी कृष्णा बन्सीलाल गहेराव यांनी याबाबत तक्रार दिली आहे.