ठाणे: मुंब्रा पनवेल महामार्गावर अजगराने केले ट्राफिक जाम, व्हिडिओ व्हायरल
Thane, Thane | Sep 29, 2025 मुंब्रा पनवेल महामार्गावर अजगर आला आणि रस्ता ओलांडू लागला, यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाले. अजगराला रस्ता ओलांडण्यासाठी बराच वेळ लागला,त्यामुळे मुंब्रा - पनवेल महामार्गावर दोन्ही वाहिनीवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.तसेच अजगर रस्ता क्रॉस करतानाचा व्हिडिओ देखील 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजल्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.