नागपूर शहर: पाचपावलीत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ५ गोवंशीय जनावरांची सुटका; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
28 मे ला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने डांबून ठेवलेल्या ५ गोवंशीय जनावरांची पोलिसांनी यशस्वी सुटका केली आहे. ही कारवाई बुद्ध नगर, युनिट क्रमांक २ जवळील एका टिनच्या शेडमध्ये करण्यात आली.गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. तेथे ५ लहान-मोठी गोवंशीय जनावरे चारा-पाण्याशिवाय कोंडून ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी सुमारे २ लाख ३० हजार रुपये किमतीचा हा मुद्देमा