लातूर: भरपावसातही कोळी समाजाचे लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लेकराबाळांसह ठिय्या आंदोलन
Latur, Latur | Sep 16, 2025 लातूर : सकल महादेव कोळी व मल्हार कोळी समाज बांधवांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून प्रमाणपत्रे द्यावीत, या मुख्य मागणीसाठी आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जबर आंदोलन पेटले. मुसळधार पावसातसुद्धा समाजबांधवांनी लेकराबाळांसह ठिय्या दिला असून, "मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही" अशी आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका असल्याचे आज दुपारी दोन वाजता पाहायला मिळाले.