नागपूर शहर: लकडगंज परिसरातील घास बाजार येथे भीषण आग; लाखो रुपयांचे लाकूड जळून खाक
लकडगंज परिसरातील घास बाजार भागात शनिवारी पहाटे भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीत मोठ्या प्रमाणात लाकडी सामान जळून खाक झाले असून, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगीची बातमी मिळताच लकडगंज अग्निशमन केंद्राचा बंब त्वरित घटनास्थळाकडे रवाना झाला. अवघ्या दोन मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले.