घनसावंगी: पारडगाव गोसेवेचा आदर्श उपक्रम : प्रल्हाद शिंदे यांच्याकडून गोशाळेला गाय दान
घनसावंगी तालुक्यातील पारगाव येथील प्रल्हाद भंडारी गोशाळेला पिरकल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद शिंदे यांनी गाय दान देत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. सध्या प्रचंड उन्हाळ्यामुळे जनावरांसाठी चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली असून अनेक गोशाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत प्रल्हाद शिंदे यांनी पुढाकार घेत गोसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रल्हाद महाराज भंडारी यांच्या गोशाळेत अनेक निराधार व भटक्या जनावरांची सेवा केली जाते. या सेवाकार्यात हातभार