फुलंब्री: फुलंब्री शहरातील कुरेशी गल्लीमध्ये अवैध कत्तलखाना वर पोलिसांचा छापा, सात लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त
फुलंब्री शहरातील कुरेशी गल्लीतून अवैध कत्तलखानावर पोलिसांनी छापा टाकून सात लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात दहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणातील एकोणावीस जनावरांना गोशाळेत हलविण्यात आले आहे तर जप्त केलेले मास पंचा समक्ष नष्ट करण्यात आले रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.