जोडगव्हाण येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा
888 views | Malegaon, Washim | Sep 23, 2025 वाशिम (दि.२३,सप्टेंबर): राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने जोडगव्हाण येथे “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” अंतर्गत महिलांची व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी, सिकल सेल व NCD स्क्रिनिंग करण्यात आले. आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांनी योग व आयुर्वेद उपचारांचे महत्त्व विशद केले. या उपक्रमातून “स्वस्थ नारी म्हणजेच सशक्त परिवार, आणि आयुर्वेद हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली” असा संदेश देण्यात आला.