अलिबाग: महामार्गावरील टोल वसुली विरोधात सत्ताधारीही आक्रमक
Alibag, Raigad | May 18, 2026 मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नसताना टोल वसुली करण्यास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विरोध केला आहे. कामे पूर्ण होत नाही, तोवर टोल वसुली करू नये, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तशी विनंती केली जाणार असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.