नागपूर शहर: तीन वाहन चोर गजाआड, 14 दुचाकी हस्तगत, गुन्हे शाखा युनिट एक ची धडाकेबाज कार्यवाही
25 मे ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे पियुष जगनाडे, अंशुल शहारे आणि दिप रामटेके तिघेही राहणारे भंडारा या तीन चोरांना अटक केली.आरोपींकडून एकूण ११ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून १३,५५,००० रुपये किमतीच्या १४ दुचाकी आणि २ मोबाईल जप्त करण्यात आले. पुढील तपास बजाजनगर पोलीस करत आहेत.