नागपूर शहर: टेका नवी वस्तीतून १२ गोवंशांची सुटका, एकाला अटक: राजेंद्र जाधव पोलीस उपनिरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव यांनी 22 मे ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टेका नवी वस्ती भागात पोलिसांनी तत्परता दाखवत एका घरावर छापा टाकला. या कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे लपवून ठेवलेल्या १२ गोवंशांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एकूण २,००,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव यांनी दिली आह