नागपूर शहर: मेट्रो स्टेशनवर विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ट्रॅफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अटक
नागपूरच्या धंतोली पोलीस ठाणे हद्दीतील 'अजनी मेट्रो स्टेशन' येथे एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, पीडित विद्यार्थिनीचे धैर्य आणि ट्रॅफिक पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला अवघ्या काही मिनिटांत अटक करण्यात यश आले.