राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, परकाम्य संलेख अधिनियम कलम १३८धनादेश अनादरीत प्रकरणे भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, कामगार तथा औद्योगिक न्यायालयातील प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहे