नागपूर शहर: गुन्हे शाखेची मोठी कारवाई; देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतुसांसह एकाला अटक: महेश सागडे पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट तीन चे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी 14 मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने नवी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर परिसरात धाड टाकून एका आरोपीला शस्त्रांसह रंगेहात पकडले. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिली आहे.