महागाव: बिहारमध्ये सापडला महागावचा गहाळ मोबाईल, मोबाईल शोधण्यात महागाव पोलिसांचे यश
महागाव पोलिसांनी प्रभावी तपास करून गहाळ मोबाईल शोधण्यात यश मिळवले आहे. महागाव येथील विलास शेबे यांचा ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल २६ सप्टेंबर रोजी बाजारात खरेदी करत असताना गहाळ झाला होता. सदर प्रकरणी विलास शेबे यांनी तत्काळ महागाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी काटेकोर तपास सुरू केला. या तपासादरम्यान संबंधित मोबाईल बिहार राज्यात सापडला. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेऊन आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता तो मोबाईल मालक विलास शेबे यांना परत केला.