नागपूर शहर: पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजरवर जीवघेणा हल्ला; कनिष्ठ कॅशिअर अटकेत : कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 17 जूनला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार,नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतील पंजाब नॅशनल बँकेच्या वर्धमान नगर शाखेत प्रशासकीय कारणावरून झालेल्या वादातून कनिष्ठ कॅशिअर स्वप्निल मधुकर भगत याने मॅनेजर राजेश मधुकर निकारे यांच्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला. घटनेनंतर आरोपी बँकेतच तासभर बसून होता, मात्र कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती दिली नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैला