जालना: जालना पोलिसांचा वाळूमाफियांना दणका; 71 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त; गोदावरी नदीपात्रातून सुरू होता अवैध वाळू उपसा
Jalna, Jalna | Jul 10, 2026 गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळूचा उपसा करून तिची चोरटी वाहतूक करणार्यांविरोधात जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंज गावाच्या शिवारात मध्यरात्री छापा टाकून पोलिसांनी तब्बल 71 लाख 51 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवार दि. 10 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालक वाहने जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.ही कारवाई 10 जुलै 2026 रोजी मध्यरात्री अडीच वाजता झाली.