महागाव: महागावात विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन, सामजिक कार्यकर्त्यांनी अडविले वाहन
महागाव शहरात खाजगी इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातील पालक आपल्या मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून इंग्रजी शाळांकडे वळत आहेत. मात्र, शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थी खाजगी प्रवासी वाहनांवर अवलंबून राहतात. याचाच गैरफायदा घेत काही वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबून धोकादायक प्रवास करत आहेत. आज दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास महागाव येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एक खाजगी प्रवासी वाहन थांबवून पाहणी केली.