नागपूर शहर: नागपूर जिल्हा परिषद गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा; आमदार डॉ. राजीव पोतदार यांची मागणी
नागपूर जिल्हा परिषदेतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि त्या अनुषंगाने सुरू असलेल्या कारवाईवर विधान परिषद आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बोलताना त्यांनी लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सहभागाची सखोल विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.