नागपूर शहर: ठवरे शाळेच्या बाजूला मैदानात चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक
15 एप्रिल ला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार अजनी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठवरे शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानात चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव रिंकू तितरमारे असे सांगण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध अजनी ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.