नागपूर शहर: घरातच धारदार शस्त्राने हत्या; पोलीस तपासाला वेग : नवीनचंद्र रेड्डी, सह पोलीस आयुक्त
नागपूरचे सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी 16 मे ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार शहरात एका खळबळजनक हत्येची घटना समोर आली आहे. अजय श्रीवास्तव असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मृतदेह त्यांच्याच राहत्या खोलीत संशयास्पद आणि रक्ताळलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबद्दलची अधिक माहिती सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली आहे.