कराड: कराड शहरामध्ये दुहेरी घरफोडी; सैदापूर व कोयना वसाहतीमधून साडेसहा लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास
Karad, Satara | Oct 20, 2025 कराड शहरातील सैदापूर आणि कोयना वसाहत या दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या घरफोड्यांच्या घटनांमुळे कराड शहरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी मिळून सुमारे साडेसहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. याबाबत पोलिस ठाण्यातून रविवारी रात्री उशिरा साडेनऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना कराड येथील सैदापूर परिसरातील मयुरेश अपार्टमेंटमध्ये दुपारी घडली.