ठाणे: तलाव पाळी येथील दिवाळी पहाट कार्यक्रम ठाकरे गटाने 'या' कारणामुळे केला रद्द..
Thane, Thane | Oct 20, 2025 ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्या पुढाकाराने मागील काही दिवसांपासून ठाण्याच्या तलाव पाळी येथील गडकरी रंगायतन येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. मात्र यावर्षी मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे त्यांच्या घरी देखील दिवाळी साजरी व्हावी यासाठी दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करून ती रक्कम मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. राबवलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.