रावेर: हिंगोणा येथून जवळच असलेल्या धुळे पाडा येथे तोल जाऊन विहिरीत कोसळून महिलेचा मृत्यू, यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Oct 19, 2025 हिंगोणा या गावापासून सातपुड्याच्या पायथ्याशी धुळे पाडा ही आदिवासी वस्ती आहे. या वस्तीवरील रहिवाशी सुनिता हिरालाल पावरा वय ३५ ही महिला पाड्यावरून जात होती दरम्यान तेथील एका विहिरीत जवळून जात असताना तोल जाऊन ती विहिरीत कोसळली तिला तातडीने रुग्णालयात नेले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.