लातूर: आपत्ती काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
Latur, Latur | Sep 17, 2025 गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीची भरपाई लवकरात लवकर देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही गतीने केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.