जालना: गणपती दोन दिवसांवर; जालना महानगरपालिका सुविधा देण्यात अपयशी?
आयुक्त अंजली शर्मा यांचा पाहणी दौरा म्हणजे ‘शो’च? नागरिकांम
Jalna, Jalna | Sep 8, 2026 गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना जालना शहरातील विविध नागरी समस्यांकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अनेक भागांत घाणीचे साम्राज्य, बंद पथदिवे आणि रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवश्यक सुविधा मिळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा केला होता. मात्र, या पाहणी दौऱ्यानंतरही प्रत्यक्ष समस्यांमध्ये